Sunday, January 18, 2026

म्हणजे सुख आहे...

तुझं दूर असूनही हक्कानं बोलणं,
म्हणजे सुख आहे....

न भेटता देखील माझी काळजी घेणं,
म्हणजे सुख आहे....

तुझ्याजवळ मन मोकळं करता येणं,
म्हणजे सुख आहे....

तुझ्या आवाजात दिवस हळूच शांत होणं,
म्हणजे सुख आहे..

थकलेल्या क्षणांतही तुझी आठवण येणं,
म्हणजे सुख आहे...

तुझ्या सौम्य बोलण्यात विसावणं,
म्हणजे सुख आहे....

अर्धवट शब्दांतही अर्थ सापडणं,
म्हणजे सुख आहे....

तुझ्या जवळ मन हळूच शांत होणं,
म्हणजे सुख आहे....

No comments:

Post a Comment