खूप काही बोलायचं होतं, पण शब्द रडत राहिले,
“मिठीत घे” म्हणायचं होतं, पण ओठ गप्प झाले.
मन भरून आलं होतं, डोळे प्रश्नांनी ओले,
तो समजून घेईल या आशेने, श्वासही थांबले.
अधुरं राहिलं सगळं, न बोललेलं मनात साठलं,
त्याच्या एका नजरेसाठी, आयुष्यभराचं मौन दाटलं.
वेळ निघून गेला, भावना मात्र तिथेच राहिल्या,
त्याच्या शांततेत हरवून, माझ्या अपॆक्षा मागे पडल्या
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐