Thursday, April 30, 2026

प्रतिबिंब

तुझ्या डोळ्यांत पाहून मला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं… आणि तुझ्या प्रत्येक धडपडीत माझं अस्तित्व जपलं जातं…

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

अनामिक हुरहूर

हसण्यातही एक शांत पोकळी आहे, आणि शांततेत तुझाच गोंधळ दडलेला… ही अनामिक हुरहूर कशाची आहे माहीत नाही..

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Wednesday, April 29, 2026

शांत काळजी

तुझ्या त्या शांत काळजीत एक वेगळीच ऊब असते… जिथे काही मागावं लागत नाही, सगळं नकळतच सापडत रहाते...

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Tuesday, April 28, 2026

छोटंसं जग

तुझ्या दिवसाच्या गडबडीतून माझ्यासाठी वेळ चोरतोस… आणि त्या चोरलेल्या क्षणांमध्ये आपलं छोटंसं जग रंगवतोस…

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

मन तुझ्याकडे धावतं

मन तुझ्याकडे धावतं, थांबवता येत नाही, तुझ्या आठवणींशिवाय काहीच सुचत नाही… दूर असलास तरी जवळच भासतोस, माझ्या प्रत्येक श्वासात तूच असतोस…

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Monday, April 27, 2026

हट्ट

तुझी आठवण रोजच येते… पण काही दिवस असे असतात, जेव्हा मन सगळं विसरून फक्त तुला समोर पाहायचा हट्ट करतं

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Saturday, April 25, 2026

ओढ तुझ्या भेटीची इतकी आहे,

ओढ तुझ्या भेटीची इतकी आहे,

की घड्याळ थांबून जावं…

तुझ्या नजरेत हरवून,

जग सगळं विसरून जावं… 

ओढ तुझ्या भेटीची इतकी आहे,

की स्वप्नातसुद्धा तूच दिसतोस,

आता फक्त एकच वाटतं…

कधी तुझ्या मिठीत घेतोस …

ओढ तुझ्या भेटीची इतकी आहे,

की क्षणही तुझ्याशिवाय सरत नाही,

तुझ्या आठवणींच्या सावलीत,

मन कुठेच हरवत नाही…

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
 ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Friday, April 24, 2026

खरं सांग ना… कसा दिसतोस?

कधी वाटतं, तू हसत असशील, कधी वाटतं, डोळे तुझे खोल असतील… शब्दांत तुझं जग दिसतं मला, माझ्या कल्पनांच्या धुक्यात तूच उमटतोस, खरं सांग ना… कसा दिसतोस?

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Thursday, April 23, 2026

तू जवळ असताना…

तुझ्या सहवासात भिजताना मन हरवतं हळूच,

तुझ्या स्पर्शाच्या नशेत…

ओल्या केसांतून फिरवताना तुझे हलके हात,

भाव किती गहिरे उमटतात तुझ्या नजरेत…

हसऱ्या तुझ्या नजरेने मला चिडवणं,

अन जवळ घेत मग अलगद शांत करणं…

उष्ण तुझे श्वास चेहऱ्यावर जाणवता,

माझं लाजून तुझ्या मिठीत हरवणं…

ओल्या देहावरून सरकणारे तुझे स्पर्श,

अन माझ्या गालांवर चढणारा तो लाजरा साज…

खोल गळ्यावर उमटणाऱ्या अधरांची मोहर,

फुलविते देह… अडकविते माझा श्वास…

उष्ण श्वासांच्या दरम्यान, तुझ्या मिठीत लपताना 

सीमा साऱ्या विरघळून जातात

मीही नकळत हरवते तुझ्या प्रत्येक स्पर्शात,

अन विरघळत जाते हळूच तुझ्या श्वासांच्या आवेगात

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

मिठीत पूर्णपणे हरवू दे

तुझ्या नजरेच्या उष्णतेत
माझं भान हरवू दे

तुझ्या स्पर्शाच्या हलक्याशा लहरींनी
मन माझं विरघळू दे

तुझ्या श्वासांच्या जवळीकित
ही धडधड शांत होऊ दे

तुझ्या मिठीत अलगद सामावून
मला पूर्णपणे हरवू दे… 

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Wednesday, April 22, 2026

Sheetal

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 

▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

यूं ही बेवजह

यूं ही बेवजह तेरा #नाम पुकारना, दिल को #सुकून सा दे जाता है… जैसे तू कहीं पास ही हो, और मेरा हर लम्हा तुझमें सिमट जाता है… यूं ही बेवजह तेरा नाम पुकारना, जैसे खुद से भी ज़्यादा तुझसे #प्यार हो जाता है…

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
 ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Sunday, April 19, 2026

भावना

शब्दांत कधी न मावणारं,

डोळ्यांत मात्र सगळं सांगणारं,

असं काहीतरी आपलं प्रेम…

हळुवार, शांत… आणि अगदी खरं.

ना गाजावाजा, ना मोठे वायदे,

तुझ्या सोबतीतच सापडतात सगळे धागे,

तू जवळ असलास की जगही थांबतं,

आणि दूर गेलास तरी मन तुझ्याच मागे

नजरेतल्या त्या हलक्या भावना, 

मनात उमटणाऱ्या गुपित गाठा, 

न बोलताही सगळं उमजतं, 

असं हे नातं चालतं … शब्दांपलीकडच्या वाटा

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
 ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Friday, April 17, 2026

हलकंसं हसू

तुझ्या थकलेल्या दिवसाला, मी हलकंसं हसू द्यावं... तुझ्या सगळ्या गोंधळात, मी तुझी शांतता व्हावं... तू जरी नाही बोललास , तरी मला तुझं मन कळतं... तुझ्या प्रत्येक धडपडीत, माझं प्रेम हळूच तुझ्यासोबत चालतं...

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
 ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Wednesday, April 15, 2026

फक्त तुझ्यासोबत

ना घाई कुठे जाण्याची,
ना कारण काही सांगायचं…
फक्त तुझ्या सोबत असणं,
इतकंच मला जगायचं…

तुझ्या नजरेत हरवताना,
स्वतःलाच विसरायचं…
तू जवळ असलास की,
सगळं जग दूर ठेवायचं…

कधी शांततेतही तुझं नाव,
मनात हलकंसं उमटतं…
तू नसताना पण somehow,
सगळं तुझ्यातच सापडतं…

हातात हात नसला तरी,
जवळीक कमी वाटत नाही…
कारण तुझं "माझं असणं",
कधीच शब्दांवर अवलंबून नाही…

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

"माझं असणं"

हातात हात नसला तरी, जवळीक कमी वाटत नाही… कारण तुझं "माझं असणं", कधीच शब्दांवर अवलंबून नाही…

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Monday, April 13, 2026

रात्रीचं मन

रात्रीचं मन थोडं वेगळंच असतं, दिवसातलं सगळं हळूच बोलत बसतं… चांदणं खिडकीतून अलगद आत येतं, अन तुझ्या आठवणींना हळूच स्पर्श करतं… मन म्हणतं, “थोडं शांत हो ना आता,”
पण हृदय मात्र अजून कुणासाठी धडधडतं… शेवटी थकलेले विचारही मिटतात अलगद, अन झोप… तुझ्या मिठीत येते नकळत…

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Sunday, April 12, 2026

तो

तो प्रेम व्यक्त कमी करतो, पण निभावतो खूप… शब्द कधी कमी पडले तरी, त्याची साथ कधी कमी पडत नाही… आणि कदाचित म्हणूनच, त्याचं प्रेम वेगळं नाही… तर खूपच खास आहे

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Saturday, April 11, 2026

डेट

चल भेटूया का डेटवर शब्द कमी अन नजर जास्त बोलू दे तुझ्यासोबत बसताना वेळपण आपल्यासाठी थांबू दे हलकेच वाऱ्यात केस उडतील माझे अन तुझी नजर माझ्यावरच थांबू दे तुझ्या हसण्यात हरवेन मी अन त्या क्षणात सगळं थांबू दे चल ना… अशी एक संध्याकाळ बनवूया जिथे मी थोडी जास्त “तुझी” होऊ दे

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐
 ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐