रात्रीचं मन थोडं वेगळंच असतं,
दिवसातलं सगळं हळूच बोलत बसतं…
चांदणं खिडकीतून अलगद आत येतं,
अन तुझ्या आठवणींना हळूच स्पर्श करतं…
मन म्हणतं, “थोडं शांत हो ना आता,”
पण हृदय मात्र अजून कुणासाठी धडधडतं…
शेवटी थकलेले विचारही मिटतात अलगद,
अन झोप… तुझ्या मिठीत येते नकळत…
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
No comments:
Post a Comment