Friday, May 29, 2026

आयुष्य सुंदर वाटतं

आयुष्य सुंदर वाटतं
जेव्हा मनात शांतता असते,
लहानशा क्षणांमध्येही
मोठी आनंदाची दुनिया दिसते…

आयुष्य सुंदर वाटतं
जेव्हा आपली माणसं सोबत असतात,
त्यांच्या एका हसण्यातही
सारे दुःख अलगद विरून जातात…

आयुष्य सुंदर वाटतं
जेव्हा प्रेम मनापासून जपलं जातं,
आनंदाच्या छोट्या क्षणांतही
संपूर्ण जग आपलंसं वाटतं…



~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Wednesday, May 27, 2026

फक्त तू

कधी कधी वाटतं…
तू बोलत राहावंसं
आणि मी तुझ्यात हरवत राहावं ❤️

तुझ्या आवाजातला थकवा
अलगद माझ्या कुशीत विरघळावा…
आणि तुझं डोकं
माझ्या मांडीवर विसावताच
जग थोडावेळ शांत व्हावं 🙂

माझी बोटं हलकेच
तुझ्या केसांत फिरत राहावीत…
आणि मध्येच
तुझ्या कपाळावरून
ओठ अलगद सरकून जावेत ❤️

त्या क्षणी
ना शब्द हवेत,
ना promises…
फक्त तू
माझ्याजवळ शांत झालेला असावास 🙂




~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Monday, May 25, 2026

जीव

जीव इतका कधी लागला, हे मलाच कळलं नाही… पण आता तुझ्याशिवाय मन कुठेच रमत नाही… तुझ्या आठवणींच्या सावलीत, मन रोज अलगद हरवतं… आणि प्रत्येक शांत क्षणी, फक्त तुझंच नाव उमटतं…


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 

▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Tuesday, May 19, 2026

श्वासांची आवर्तने

माझ्या श्वासांची आवर्तने
तुझ्या मिठीत अलगद संपावी…
आणि त्या शांत क्षणी,
मी पुन्हा पूर्णपणे तुझी व्हावी…

तुझ्या हृदयाच्या ठोक्यांत
माझं नाव हळूच ऐकावं,
तुझ्या स्पर्शाच्या उबेत
सगळं जग विसरून जावं…

ना शब्दांची गरज उरावी,
ना कुठल्याही वचनांची साथ,
फक्त तू, मी… आणि
प्रेमाने भरलेली ती शांत रात…


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Sunday, May 17, 2026

भेटीची ओढ

न भेटण्याची कारणं खूप होती, पण भेटीची ओढ वाढत राहिली… तुझ्या शांत समजून घेण्यातही, एक हळवी जवळीक सापडत गेली…



~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

मायेची ऊब

आजची सकाळ थोडी शांत आहे, कदाचित तू जवळ नाहीस म्हणून… पण तुझ्या मायेची ऊब अजूनही, माझ्या श्वासांत हलकेच आहे…


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Saturday, May 16, 2026

one liners



तुझ्यासाठी लिहायला बसलं की… शब्द माझे राहत नाहीत, ते पूर्णपणे तुझे होऊन जातात…


एक मिठी तुझी ना मागता ही मिळावी… मनातल्या प्रत्येक गोंधळाला तुझ्यात शांतता सापडावी…

काही लोक फक्त सवय नसतात… ते दिवसाची सगळ्यात सुंदर सुरुवात असतात.

सगळ्यांशी बोलणं होतं…
पण वाट फक्त एका notification चीच पाहिली जाते.

सगळ्यांना सगळं कळत नाही… काही गोष्टी फक्त दोघांनाच कळतात…

प्रेमात कधी कधी फक्त जाणवणं पुरेसं असतं, बोलायची गरज नाही.

Monday आहे and Coffee is not working today कारण Coffee पेक्षा strong तर फक्त तुझी मिठीच आहे …


तुझ्या मिठीत एक विश्वास आहे… जो शब्दांपेक्षा खूप जास्त बोलतो..

वेळ पुढे सरकतेय… पण मन अजूनही तुझ्याच एका क्षणात अडकलंय…


तुझ्यावर नाराज नाही राहता येत…
रुसायचं ठरवलं तरी मन पुन्हा तुझ्याचकडे वळतं


तुझ्या नावात काही जादू आहे बहुतेक… उगाचच मन पुन्हा पुन्हा तिथेच जातं.

ना पास होने की ज़िद, ना दूर जाने का डर, बस तू मेरे ख्यालों में रहे… इतना ही काफी लगता है…

तुझ्यावर प्रेम करण्यासाठी मला कधी reason लागत नाही… कारण तूच माझं एकमेव reason आहेस

जेलसी म्हणजे तुझ्यावर doubt घेणं नाही, तर तुझ्यावर किती जीव आहे हे दाखवणं असतं.

तो कितीही दूर असला तरी,
माझ्या मनात त्याच्यासाठी एक कोपरा कायम उजळलेलाच असतो…

आपण बोलतोय अजूनही…
पण connection कुठेतरी हरवलंय.

काही गोष्टी संपत नाहीत… त्या फक्त आतल्या आत तुटत राहतात.

तुझ्याशी बोलणं luxury नाही…
पण त्याशिवाय दिवस complete होत नाही…




आज काही लिहायचंच नव्हतं…
पण तुझा विचार आला, आणि शब्द आपोआप सापडले


Monday म्हणजे
थोडं काम, थोडं हसू… थोडंसं तू अन बाकी तुझ्या आठवणी


आपण perfect नाही… पण एकमेकांसाठी enough आहोत


आपलं connection simple नाही…
पण special नक्की आहे

"काही शापांना उःशाप नसतो…
त्यांची वेदना मात्र शांत राहायला शिकवते."


तुझ्यासोबतचं vibe… logic पेक्षा जास्त strong आहे… म्हणूनच ते explain होत नाही…


jealous तर होते मी…
पण ते दाखवत नाही… कारण ते तुला समजावं असं वाटतं, सांगावं नाही…

काही नात्यांना नाव लागत नाही… पण त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही.

जी व्यक्ती तुम्हाला गमावण्याची भीती ठेवते ,
ते तुम्हांला feel करून देतात … guess करायला लावत नाही.

some feelings can’t be explained… they’re just priceless


तुझ्याशी बोलायला कारण लागत नाही… आणि न बोलायला मन मानत नाही…


तू special आहेस हे सांगायला reason नाही… फक्त तू आहेस, तेच पुरेसं आहे

तुझ्याबरोबरचं connection शब्दांत सांगता येत नाही… ते फक्त feel होतं…


खूप काही बोलायचं आहे पण शब्द अपुरे पडतात... माझ्या मौनातला अर्थ समजून घेशील का?

आज March-end आहे, तर थोडा तुझ्या आठवणींचा हिशोब करूया.....


ऐक ना, तुझ्या आठवणींना सांग ना, आज सोमवार आहे, कामात डिस्टर्ब करू नका म्हणून."



सगळं सांगायचं नसतं शब्दांत, काही गोष्टी नजरेतच राहू द्याव्यात…


तू आहे म्हणूनच, माझ्या शांततेलाही अर्थ आहे…”

8:59 AM · Mar 26, 2026
कधी कधी दूर जाणं हेच सर्वात मोठं प्रेम असतं…


6:35 PM · Mar 25, 2026
चाहे लाख जमाना फ़िदा हो हमपे हमारी जान तो उनमे बसती है इसलिए तो उन के सामने हमारी नज़रे झुकती है


9:13 AM · Mar 25, 2026

दुरियोंसे मोहब्बत ख़तम नहीं होती बस कोई उनसे कह दे कभी ख़्वाबों में आया करे.....



~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
 ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐