Wednesday, May 27, 2026

फक्त तू

कधी कधी वाटतं…
तू बोलत राहावंसं
आणि मी तुझ्यात हरवत राहावं ❤️

तुझ्या आवाजातला थकवा
अलगद माझ्या कुशीत विरघळावा…
आणि तुझं डोकं
माझ्या मांडीवर विसावताच
जग थोडावेळ शांत व्हावं 🙂

माझी बोटं हलकेच
तुझ्या केसांत फिरत राहावीत…
आणि मध्येच
तुझ्या कपाळावरून
ओठ अलगद सरकून जावेत ❤️

त्या क्षणी
ना शब्द हवेत,
ना promises…
फक्त तू
माझ्याजवळ शांत झालेला असावास 🙂




~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

No comments:

Post a Comment