तुझ्या सहवासात भिजताना मन हरवतं हळूच,
तुझ्या स्पर्शाच्या नशेत…
ओल्या केसांतून फिरवताना तुझे हलके हात,
भाव किती गहिरे उमटतात तुझ्या नजरेत…
हसऱ्या तुझ्या नजरेने मला चिडवणं,
अन जवळ घेत मग अलगद शांत करणं…
उष्ण तुझे श्वास चेहऱ्यावर जाणवता,
माझं लाजून तुझ्या मिठीत हरवणं…
ओल्या देहावरून सरकणारे तुझे स्पर्श,
अन माझ्या गालांवर चढणारा तो लाजरा साज…
खोल गळ्यावर उमटणाऱ्या अधरांची मोहर,
फुलविते देह… अडकविते माझा श्वास…
उष्ण श्वासांच्या दरम्यान, तुझ्या मिठीत लपताना
सीमा साऱ्या विरघळून जातात
मीही नकळत हरवते तुझ्या प्रत्येक स्पर्शात,
अन विरघळत जाते हळूच तुझ्या श्वासांच्या आवेगात
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
No comments:
Post a Comment