Between the Lines
Sunday, February 08, 2026
चंद्र
चंद्र आपला वेगळा असला ,
तरी तुझं अस्तित्व तिथे सापडतं
अंतर जरी आपल्यात असलं,
मन मात्र तुझ्याकडेच धाव घेतं
श्वासाश्वासात तुझं नाव
हळूच उमटतं
तू जवळ नसतानाही
मन तुझंच वाटतं
ही रात्र शांत दिसते जगाला,
मात्र तूच माझ्या मनात
माझं एकटेपण हरवतं
तुझ्या आठवणींच्या प्रकाशात
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद
पुस्तक: चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद लेखक: मारुती चित्तमपल्ली प्रकाशक: मौज प्रकाशन गृह परवाच अमेयदाना काही पुस्तके पाठवल...
आठवणींचा पाऊस
नमन नटवरा!!!!!!!!!!!
‘बालगंधर्व’ ही पाचच अक्षरे आहेत पण महाराष्ट्राचे अवघे पंचप्राण या पाच अक्षरांत सामावलेले आहेत, असे आचार्य अत्रे म्हणायचे. शं...
No comments:
Post a Comment