स्पर्शात तुझ्या मोहरून जावे,
अधरांच्या मिलनाने श्वासही हरवून जावे…
संथ तुझ्या बोटांच्या रेषांनी
माझ्या त्वचेवर कविता उमटत जावे…
तुझ्या मिठीत दडताना असे विरघळावे,
की देहाच्या पलीकडे आत्मेही एकरूप व्हावे…
तुझ्या नजरेच्या ज्वालेत असे जळून जावे,
की राखेतूनही फक्त तुझंच प्रेम उरावे…
तुझ्या उष्ण श्वासांच्या सावलीत थरथरावे,
एक श्वास बनून सामावून जावे…
संथ जळणाऱ्या या ओढीत
क्षणोक्षणी मी तुझ्यात खोल उतरून जावे…
स्वतःलाच सावरता येऊ नये…
तुझ्या ओढीच्या वेड्या वादळात इतके उधळून जावे,
घाई नसावी मिलनाच्या क्षणाला कधी,
आपण दोघं एकच शांत धडधड बनून जावे…
चांदण्यांच्या साक्षीने संथ कुजबुजत,
आयुष्यभर त्या मिठीतच जगून जावे…
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
No comments:
Post a Comment