Monday, June 08, 2026

एकमेकांत गुंतून जाणं...

थोडं लाजणं, थोडं हसणं,
थोडं नजरेत हरवून बसणं...

थोडं जवळ येणं अलगद,
आणि शब्दांशिवाय सगळं सांगणं...

थोडी मिठी, थोडा स्पर्श,
थोडासा श्वासातला सहवास...

थोडं अबोल राहणं दोघांनी,
पण मन मात्र बोलत राहणं...

थोडं तुझं, थोडं माझं,
थोडंसं वेडं जगणं...

आणि या सगळ्यात नकळत,
एकमेकांत गुंतून जाणं... 


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

No comments:

Post a Comment